Press Release
Our efforts are recognized by various newspapers and magazines across India. Please check some of the articles below.
 
हडपसर - आपल्या उत्पनातील काही भाग समाजासाठी खारीचा वाटा म्हणून उचलायचा, असा ध्यास घेऊन मुंढवाच्या लोणकर माध्यमिक विद्यालयातील 1990 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्कर्ष ग्रुपची स्थापना केली आहे. यातून त्यांनी विविध समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेतले आहेत. सुरवातीला आपल्या मित्रांच्या गाठीभेटी व्हाव्यात, संवाद व्हावा या उद्देशाने हे तरुण एकत्र आले. मात्र भेटीतून केवळ आपलेच सुख-दुःख वाटून न घेता सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून व समाजाचे ऋण फेडण्यासाठी या तरुणांनी आपल्या भागात सामाजिक कार्य करण्याचा ध्यास घेतला.

यंदा या ग्रुपने मुंढवा येथील लोणकर माध्यमिक विद्यालय, सारथी शिक्षण मंडळ, बालविकास विद्यामंदिर आणि कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळा मुलांची या शाळांमधील एकूण चाळीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये वर्गणी काढून शिष्यवृत्ती दिली. या शाळांना अशा प्रकारे दर वर्षी शिष्यवृत्ती देण्यात येणार असून दर वर्षी यात वाढ करण्यात येणार असल्याचे या ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

महिलांना संधी देण्यासाठी या ग्रुपच्या माध्यमातून या कार्यकर्त्यांनी उत्कर्ष महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन केली आहे. या माध्यमातून महिलांना बचतीची सवय लावली. पतसंस्थेत नोकरीसाठी महिलांना अधिक संधी देण्यात आली आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून महिला व गरजूंना विविध व्यवसायासाठी कर्ज देण्यात येत आहे. कर्जाची परतफेड शंभर टक्के असल्याचेही या कार्यकर्त्यांनी सांगितले. या तरुणांचा उत्कर्ष बचत गट असून विविध कारणांसाठी गटातील सभासदांना रास्त कारणासाठी मदत देण्यात येते. अधिकाधिक रक्तदात्यांनी ग्रुपच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन या गटाचे कार्यकर्ते गणेश बधे, महेंद्र लुणिया, महेश चव्हाण, संजय खोमणे अनिल गायकवाड यांनी केले आहे. या गटातील सभासद वेगवेगळे व्यवसाय करत आहेत. सामाजिक कामासाठी ऐच्छिक वर्गणी फक्त गटातील सभासदांकडून काढण्यात येते. ग्रुपच्या बाहेरील लोकांची वर्गणी स्वीकारली जात नाही.

उत्कर्ष ग्रुपने रक्तदाते व गरजूंसाठी उपयोगी ठरणारे www.bloodwala.com हे संकेतस्थळ सुरू केले आहे. यासाठी अधिकाधिक रक्तदात्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन या गटाचे कार्यकर्त्यांनी केली आहे.

http://beta.esakal.com/2009/03/19220839/western-maharashtra-lonkar-hig.html
 
Username
Password
 
Click here to register as donorClick here to post your blood requestClick here to recommend a friendClick here for group registration
Utkarsh Pratishthan and Utkarsh Group Welcomes You !